पुन्हा एकदा शहाबानो अवतरेल का ?

Kolhapur news
By -

 

        


        कोल्हापूर न्यूज   / वि .रा .भोसले


शहा बानो ने पाच मुलांचा सांभाळ करण्यासाठी नवऱ्याकडून पोटगी मागितली.खटला सुप्रीम कोर्टापर्यंत पोचला .सुप्रीम कोर्टाने तिला न्याय दिला.

 पण

पण तत्कालीन प्रधान मंत्री राजीव गांधी यांनी सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय फेटाळून मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड प्रमाणे निर्णयच फिरवला.कारण ?


व्होट बँक.


अरेरे ,सत्तेसाठी एका महिलेच्या जीवन विषयक हक्कांचा बळी.!!

    मोदींनी तीन तलाक कायादा मंजूर केला.

    देशातल्या कोट्यवधी मुस्लिम घटस्फोटित परित्यक्ता महिलांना न्याय मिळाला.पण..


पण एकही शहाबानो न्याय मागायचा पुढे आली नाही. कारण..


कारण शरीयत आणि मौलवीं ची शिकवण.


 जगण्या साठी नुसती हवा आणि पाणी पुरेसे नाही. अन्न सुध्दा लागते.


कोण देणार ?


 ते पोटगीतून मिळत असते.

ती पोटगीच बंद.अशा हजारो महिला रस्त्यावर, रेल्वेत भीक मागून गुजराण करतात.


    काय करायचा कायदा.?


त्यापेक्षा धर्म महत्वाचा हे त्यांच्या मनावर बिंबवले जाते.शरीयत नावाची जादू त्यांच्यावर मंतरली जाते.

  उदाहरण घेऊ.

हैद्राबाद मतदार संघातून डॉ.माधवी लता या उच्च शिक्षित समाज सेविकेने निवडणूक लढवली. ओवेसीना  पराभूत करण्याइतका आत्मविश्वास डॉ.माधवी यांच्याकडे होता.कारण त्यांनी  मुस्लिम महिलांच्या तीन तलाक विरुद्ध  आंदोलनात भरीव कार्य केले होते.हजारो मुस्लिम महिलांचा यात त्यांना पाठिंबा होता.कारण त्यांना न्याय मिळणार होता.

     दुर्दैवाने निवडणुकीत या महिलांची मते डॉ.माधवी यांना मिळाली नाहीत.कारण ?


कारण शरीयत .


  ओवेसींना पराभूत करणारच असा आत्मविश्वास बाळगणाऱ्या डॉ.माधवी लता यांना त्यांच्या निम्मी मते मिळाली.

  येथे जीवन हरले ,धर्म जिंकला.

     चारच दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने एक महत्वाचा निर्णय दिलाय.

  हिंदू महिलांप्रमाणे मुस्लिम महिलांना सुध्दा पोटगीचा तितकाच अधिकार आहे.

    हा तर पुन्हा शहाबानो आणि मोदींच्या तीन तलाक कायद्याचा विजय आहे.पण..


पण इथेही मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आडवे आले.

 बोर्डाला सुप्रीम कोर्ट निर्णय मान्य नाही,मोदी कायदा मान्य नाही,संविधान मान्य नाही,शहाबानो न्याय मान्य नाही.मग काय मान्य आहे ?


फक्त शरीयत.


याला काय म्हणायचे ?


धर्मांध हुकूमशाही.पुरुष प्रधान समाज रचनेची शेकडो वर्षांची परंपरा.स्त्री ला कसलाच हक्क नाही.

ती फक्त एक भोगवस्तू आहे.

   भारतातील नव्वद टक्के मुस्लिम  समाज परिवर्तित (converted) आहे.हातावर पोट असलेल्या लक्षावधी गरीब लोकांना पैसा,दमदाटी यांच्या जोरावर मोगलांनी मुस्लिम बनवले.त्यांना ना संपत्ती ना जमीन.मजुरी करून किंवा मिळेल ती कामे करून पोट भरायचे त्यांच्या नशिबी आले.

   फळे विकणे,पंक्चर काढणे,रत्यावर, मोठ्या मंदिरा समोर हारतुरे, माळा, उदबत्त्या अशा गरजेच्या वस्तू विकून पोट भरणे त्यांच्या नशिबी आले.त्यातून कांहीं व्यापारी बनले,व्यावसायिक व उद्योजक बनले.कांहीं गुन्हेगारीकडे वळले . हाजी मस्तान, दाऊद यातूनच तयार झाले.

   या देशात राहून जीवन घालवायचे तर किमान या देशाशी इमान तरी राखायलाच पाहिजे.

इथेही मौलवी आडवे येतात.

   त्यांनी प्रणच केलाय .या मुस्लिम बांधवांना शरीयत नावाचे गुंगुचे औषध पाजयचे.दुर्दैवाने लाखो पीडित महिला या शरियतला बळी पडल्या आहेत.त्यांना हक्क,न्याय,सन्मानाचे जगणे वगैरे कांहीं माहिती नाही.मुलांना जन्म देत रहाणे येवढेच त्यांच्या हाती आहे.

    सुप्रीम कोर्ट,संविधान,तीन तलाक शहबानो यांचे आरसे त्यांच्यापुढे धूसर झालेत.त्यात त्यांना काहीच दिसू दिलं जातं नाही.शरीयत नावाचा बुरसट पडदा या आरस्यावर धरलेला आहे.