'लाडक्या बहिणी' नंतर आता 'लाडक्या भावा'साठी मुख्यमंत्री योजना ; पंढरपूर मधून मुख्यमंत्र्यांची घोषणा ; प्रत्येक महिन्याला सहा हजार रुपये

Kolhapur news
By -

 

               


               कोल्हापूर न्यूज नेटवर्क

   

    पंढरपूर :  लाडकी बहीण या योजनेनंतर विद्यार्थ्यांसाठीही खास विद्यावेतन योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात केली आहे. बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सहा हजार, डिप्लोमा 8 आणि डिग्रीच्या विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये विद्या वेतन देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.


आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित केलेल्या कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक कृषी पंढरी महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील देखील उपस्थित होते.

इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरकारने अशी योजना आणली असून याद्वारे बेरोजगारीवर तोडगा निघणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरकारने अशी योजना आणली असून याद्वारे बेरोजगारीवर तोडगा निघेल असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी  यावेळी  व्यक्त केला.

----------------------------------------------------

        


आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात जाऊन सलग तिसऱ्यांदा प्रथेप्रमाणे शासकीय पूजा  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक केली. 


यंदा नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील शेतकरी बाळू शंकर अहिरे आणि आशाबाई बाळू अहिरे यांना मानाचे वारकरी म्हणून शासकीय पूजेला बसण्याचा मान मिळाला. 


यावेळी  मुख्यमंत्र्यांनी विठुरायाच्या चरणी लीन होत राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव, राज्यातील बळीराजाचे दुःख कष्ट दूर करून त्याला सुजलाम सुफलाम ठेव, राज्यात उत्तम पाऊस पडून सर्वांना दिलासा दे एवढेच मागणे याप्रसंगी विठुरायाच्या चरणी मागितले. 

 

यावेळी मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी सौ.लता, मुलगा  डॉ.श्रीकांत, सून वृषाली, नातू रुद्रांश तसेच केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, मंत्रिमंडळातील माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन, तानाजी सावंत, चंद्रकांत पाटील आणि दीपक केसरकर तसेच शिंदे कुटूंबातील सर्व सदस्य आवर्जून उपस्थित होते.

          

इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरकारने अशी योजना आणली असून याद्वारे बेरोजगारीवर तोडगा निघणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.