कोल्हापूर न्यूज नेटवर्क
राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. पुणे, मुंबई शहरातील जनजीवन विस्कळीत झालेले असून अनेक भागातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. अशातच राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. उद्या होणारी दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. दहावीचा पुढे ढकलण्यात आलेला पेपर 31 जुलै रोजी तर बारावीचे पेपर 9 ऑगस्ट रोजी होणार आहे.
26 जुलै रोजी दहावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेचा विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 चा पेपर सकाळी 11 ते दुपारी 1 दरम्यान नियोजित होता. मात्र आता हा पेपर 31 जुलै रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 दरम्यान होईल. तर बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेचा वाणिज्य आणि संघटन व्यवस्थापन, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान, एमसीव्हीसी पेपर-2 हे तीन पेपर होते. हे बारावी बोर्ड पुरवणी परीक्षेचे तीन पेपर आता 9 ऑगस्ट रोजी होणार आहे.

