मुख्यमंत्री साहेब , लाडक्या नातवांचे पण तेवढे बघा...

Kolhapur news
By -

  

 

           कोल्हापूर न्यूज नेटवर्क


   मुख्यमंत्री साहेब, 

लाडकी बहीण, लाडका भाऊ यांचे झाले असेल तर लाडक्या नातवांचे पण तेवढे बघा ...

वंचित व दुर्बल घटकातील गोरगरिबांच्या मुलांना RTE मधून खाजगी शाळेत मोफत शिक्षणाचा हक्कच यावेळी राज्य सरकारने काढून घेतला आहे. यामुळे हजारो मुलांना शाळेत अद्यापही प्रवेश मिळू शकला नाही ...


RTE मध्ये राज्यभरात 9331 शाळा असून 1 लाख 15 हजार च्या वर जागा आहेत. सरकार विरोधात जनहित याचिका उच्च न्यायालयात आहे. त्यामुळे राज्यसरकारने प्रक्रिया पूर्ण करूनही खाजगी शाळेत मुलांना अद्यापही प्रवेश दिले नाही आहेत (शाळा सुरू होऊन महिना लोटला आहे) यावेळी खाजगी शाळा वगळण्याचे एकमेव कारण, अनेक वर्ष या शाळांना देण्यात येणारे परतीचे असे 1800 करोड रुपये द्यायला सरकारकडे पैसे नाहीत..


तरीही लाडकी बहीण, भाऊ झाले असतील तर या लाडक्या नातवांसाठी पण पैसे भरून टाकावे सरकारने आणि शाळा प्रवेशाच्या प्रतिक्षेत असलेल्या लाखो गोरगरीब मुलांचे प्रवेश करून त्यांचे शैक्षणिक नुकसान वाचवावे ... आणि त्या पालकांना दिलासा द्यावा...!!!


   अशी मनसे नेते  गजानन काळे यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून पोस्ट लिहिली आहे.