कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड जवळील वेदगंगे वरील कुरणी बंधारा पाण्या खाली गेला आहे. सुरक्षेचा इशारा देण्यात आला असून शिवभक्तांनी बॅरिकेट लाऊन पुलावरील मार्ग बंद केला आहे.या पुलावरून कुरणी, भडगाव, मळगे बु.इत्यादी गावचे नागरिक व विद्यार्थी विद्यार्थिनी सायकल ,स्कूटी मोटर सायकल वाहानाने आणि पायी सुध्दा या पुला वरून मुरगूड ला येत जात असतात.कांहीं चार चाकी व अवजड वाहने सुध्दा या मार्गावरून जात असतात.
पुराचे पाणी वाढत असलेने हा मार्ग धोकादायक आहे .सकाळी फिरायला जाणाऱ्या महिलांना सुध्दा पुलावरून जाण्यास शिवभक्त व सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रतिबंध केला.
सोशल मिडिया वरून पुर,धबधबे यांच्या
पाण्यामुळे जीवित हानी झाल्याच्या बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या आहेत .
नगर परिषद व पोलिस ठाण्याला सुध्दा खबर देण्यात आली आहे.
सर्व वाहतूक चौंडाळ फाटा व निढोरी मार्गे वळवण्यात आली आहे.


