मुरगूड निढोरी रस्त्यालगतच्या स्मशान शेड भोवती झुडूपांची गर्दी ; नगरपरिषदेला निवेदन.

Kolhapur news
By -

         

         


           कोल्हापूर न्यूज नेटवर्क


मुरगूड ते निढोरी रस्त्याला लागून शहरासाठी एक पर्यायी स्मशान शेड आहे.

     नदी पासून अवघ्या शंभर मीटरवर असलेल्या या शेडचा सर्रास वापर होतो.मध्यंतरी नगरपरिषदेने शेड शेजारची जागा नांगरून ,साफ करून बैठकीसाठी कांहीं बाकांची सुध्दा व्यवस्था केली आहे.

   या शेड भोवती पावसाळी झुडूपांची गर्दी झाल्याने शेड अक्षरशः झाकळून गेले आहे.

    महापुराच्या पाण्यात सुध्दा दोन तीन दिवस हे शेड बसलेले असते.एरव्ही ते वापरतात. कोरोना काळात याच शेड चा अधिक उपयोग झाला होता .

    शेड भोवतालची झुडुपे काढून टाकून त्याची सफाई व्हावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने नगरपरिषदे कडे करण्यात आली आहे.

  मागणी अर्जावर खालील कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत

     तानाजी भराडे,सोमनाथ यारनाळ कर,सर्जेराव भाट,ओंकार पोतदार,संकेत शहा,जगदीश गुरव,नामदेव भांदिगरे ,रणजित मगदूम,अनिल कांबळे,सूरज खंडागळे, हृषिकेश भारमल.