हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे २७ हजार हिऱ्यांनी साकारलेले अनोखे पोर्ट्रेट भेट

Kolhapur news
By -

 

    



                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क


   मुंबई :हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे २७ हजार हिऱ्यांनी साकारलेले अनोखे पोर्ट्रेट आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री निवासस्थानी महाराष्ट्रातील तमाम निष्ठावान शिवसैनिकांकडून सप्रेम भेट म्हणून देण्यात आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख हर्षल प्रधान यांच्या संकल्पनेतून साकारलेले आणि ख्यातनाम आर्टीस्ट शैलेश आचरेकर यांच्या कलापूर्तीने सजलेले हे हिऱ्यांनी नटलेले बाळासाहेब ठाकरे यांचे पोर्ट्रेट अतिशय आकर्षक आहे.


शैलेश आचरेकर यांनी यापूर्वी आपल्या कलेमुळे अनेक पुरस्कार मिळवले आहेत. ख्यातनाम कलावंत म्हणून ते सर्वश्रुत आहेत. शैलेश यांनी हिऱ्यांनी साकारलेले बाळासाहेब खरोखर मनमोहक आहेत आणि बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात नक्कीच ते एक प्रमुख आकर्षण ठरेल, अशी प्रतिक्रिया हे पोर्ट्रेट स्नेहपूर्वक स्वीकारताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.