बारा कोटींच्या संताजी स्मारकाचा सेनापती कापशीत लवकरच होणार लोकार्पण सोहळा

Kolhapur news
By -

 

     


    


                कोल्हापूर न्यूज नेटवर्क


        सेनापती कापशी येथील बहुप्रतिक्षित  संताजी घोरपडे स्मारक पुर्णत्वाच्या शेवटच्या टप्प्यात आहे.ऑगस्ट मध्ये या स्मारकाचा लोकार्पण सोहळा होईल असे ना.हसन मुश्रीफ यांनी नुकतेच अश्वस्त केले.  त्या अनुषंगाने त्यांनी कापशी येथील स्मारकाची पाहणी केली.

       

संताजी घोरपडे यांचे स्मारक व्हावे म्हणून त्यांचे ११वे वंशज जयसिंगराव घोरपडे उर्फ बाळ महाराज यांनी इच्छा व्यक्त केली होती.एवढ्या मोठ्या सेनानीचे यथोचित  स्मारक महाराष्ट्रात कोठे नाही. सातारा व सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवर कारखेल येथे एक छोटे स्मारक आहे.त्याला तेथील स्थानिक लोक संतुबाबांची समाधी असे संबोधतात.कापशी येथील स्मारक मात्र सेनापतींच्या गौरवशाली कर्तृत्वाला साजेसे असेच होणार आहे. बाळ महाराज आणि तमाम महाराष्ट्राला अपेक्षित असलेल्या स्मारकासारखे ते भव्य व प्रेरणादायी असणार आहे.

    

 या स्मारकासाठी कापशीचे माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत,सुनील चौगुले व त्यांचे अन्य कांहीं सहकारी यांनी सतत पाठपुरावा करून ना. हसन श्रीफ यांचे कडून दोन तीन टप्प्यात पुरेसा निधी मंजूर करून घेतला. ना.मुश्रीफ यांनी कोणताही राजकीय हेतू न ठेवता महाराष्ट्र शासनाकडून निधी मंजूर करून घेतला.

 

   गावाच्या वेशीवर असलेल्या तलावाच्या जागेत जलाशयाला सामोरे ठेवून संताजी घोरपडे यांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्यात येईल.कोल्हापरचे सुप्रसिध्द शिल्पकार किशोर पुरेकर हे भव्य शिल्प साकारणार आहेत.स्मारकाभोवती विस्तीर्ण कौम्पौंड भिंत असेल.शिवाय एक बहुउद्देशीय सुसज्ज सभागृह  ,संग्रहालय यांचाही त्यात समावेश असेल.

   

   संताजी आणि धनाजी यांना स्वराज्य रक्षक म्हंटले जाते.त्यांनी प्राणपणाने स्वराज्याचे रक्षण केले म्हणूनच पुढे मराठा साम्राज्य दिल्ली आणि अटके पर्यंत जाऊन थडकले.सेनापती संताजी घोरपडे यांचा प्रेरणादायक इतिहास आजच्या युवा पिढीला समजणे आवशक आहे असे मत सुप्रसिद्ध साहित्यिक स्वामीकार स्व. रणजित देसाई यांनी कापशी येथील स्वामी चौकातील सभेत व्यक्त केले होते.

  याशिवाय कोल्हापूरचे प्रसिद्ध इतिहास संशोधक प्रा.जयसिंगराव पवार यांनी सुध्दा एक दोन वेळ भेट देऊन या स्मारकाबद्दल कौतुकोद्गार काढले आहेत.संताजी घोरपडे यांच्या शौर्याचे वर्णन त्यांच्या लिखानातून  आढळून आले आहे.

   कोल्हापूरच्या प्रख्यात आर्किटेक्ट अमरजा निंबाळकर यांच्या देखरेखीखाली हे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

    ना.मुश्रीफ यांनी सुध्दा या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही असे म्हंटले आहे.संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या रूपाने एक एक सजीव कार्यान्वित असे स्मारक त्यांनी यापूर्वीच सुरू केले आहे.