कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड जवळील कुरणी बंधाऱ्यावर पुन्हा एकदा पुराचे पाणी आले आहे.या पाण्याला ओढ आहे. बॅरिकेट्स लावूनही पायी व दुचाकी सायकल वाहतूक सुरूच आहे.यात कांहीं अल्पवयीन मुलांचा व विद्यार्थ्यांचा सुध्दा समावेश आहे.
मुरगूड येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्याचे ए पी आय शिवाजी करे यांच्या कानावर ही बाब घातल्या नंतर त्यांनी लगेच बंधाऱ्यावर पोलिस बंदोबस्ताची व्यवस्था केली आहे.
याठिकाणी कोणी हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केल्यास पोलिस कारवाई करण्यात येईल असेही सांगितले.
पूर परिस्थितीत नागरिकांच्या जिवीताशी खेळ होईल असे कोणतेही वर्तन कायद्यास विसंगत मानले जाईल.
दूधगंगे पेक्षा वेद गंगेचे पाणी वेगाने वाढत आहे.याच नदीवर पाटगाव धरण आहे.त्यामुळे सावधानता बाळगावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्यांनी नागरिकांना केले आहे.

