वेदगंगेने रौद्र रूप धारण केले ; तीन ट्रक पाण्यात अडकले ; पुराचे पाणी जागोजागी रस्त्यावर पसरले.

Kolhapur news
By -

 

           


             कोल्हापूर न्यूज नेटवर्क


       वेदगंगेच्या महापुराचे पाणी निपाणी ते निढोरी रस्त्यावर जागोजागी पसरले आहे त्यामुळे त्या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

  मुरगूड जवळ निढोरी रस्तावर स्मशान शेड जवळच्या छोट्या पुलावरून दोन फूट वहाते पाणी आहे.बहिर्जी पेट्रोल पंपाजवळ  दीड फूट पाणी आहे. यमगे शिंदेवाडी दरम्यान एक फुटा पर्यंत पाणी पसरले आहे.

     स्मशान शेड जवळील रस्त्यावर तीन ट्रक पाण्यात अडकले असून ते जे सी बी ने.ओढून काढण्याचे काम सुरू आहे.

    कांहीं स्वयंसेवक व पोलिस पूरग्रस्तांना मदत करत आहेत.

 वेदगंगेच्या पलीकडून मुरगूड मध्ये  विविध शाळांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून येण्यास मनाई करण्यात आली आहे.

    ही पूर परिस्थिती शनिवार पर्यंत कायम राहील असे सांगण्यात येत आहे.