दोन्ही राष्ट्रवादी पक्ष हे श्रीमंत मराठ्यांचे - प्रकाश आंबेडकर

Kolhapur news
By -

 

        


 मुंबई :ओबीसी आणि मराठा समाज आज विरोधात उभे राहिले आहेत. मात्र, राजकीय पक्ष कोणतीही भूमिका घेण्यास तयार नसल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी  पत्रकार परिषदेत बोलताना केली आहे. इतकेच नाही तर श्रीमंत मराठे म्हणजे शरद पवार, अजित पवार यांचा राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष असल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे. तर भाजप व शिवसेना उबाठा यांचा पक्ष म्हणजे कायस्थ प्रभू असल्याची टीकाही त्यांनी केली.  आंबेडकर यांनी जरांगे पाटील यांच्यावरही टीका केली. जरांगे पाटील थेट त्यांना आरक्षण द्या, नाहीतर आरक्षण रद्द करा म्हणत असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले आहे.


वंचित बहुजन आघाडी नेते प्रकाश आंबेडकर यांनी आता आरक्षण बचाव यात्रा सुरू केली आहे. 25 जुलै ते 7 ऑगस्ट या काळात ही यात्रा चालणार आहे. चैत्यभूमीवरुन या यात्रेला सुरूवात होत आहे. या यात्रेमागणी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केली.  त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते .यावेळी त्यांनी गरीब आणि श्रीमंत मराठे अशा दोन गटांत त्यांनी मराठा समाजाचे वर्गीकरण केल्याचे दिसून येत असल्याचे सांगितले .