कोल्हापूर न्यूज नेटवर्क
कागल तालुका शिवसेनेच्या वतीने उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे यांच्या नेतृत्वाखाली एसटी परिसरामध्ये आज आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते .
कागल परिसरामध्ये अनेक ठिकाणी खड्ड्याचे साम्राज्य असून या खड्ड्यांमध्ये पाणी साचून या पाण्याचा त्रास एसटी परीसरांमध्ये येणाऱ्या, जाणाऱ्या सर्व नागरिकांना होतो . कागल नगरपालिका प्रशासनाने वेळेत लक्ष देऊन हे खड्डे ताबडतोब मुजवावेत यासाठी निदर्शने करण्यात आली .
रस्त्याचे निकृष्ट काम करणाऱ्यावर योग्य कारवाई करून त्यांना काळ्या यादी टाकावं व लवकरात लवकर हे खड्डे मुजवून नगरपालिकेने लोकांना चांगली सुविधा देऊन नागरिकांची गैरसोय दूर करावी अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला .यावेळी जय भवानी जय शिवाजी , निष्क्रिय प्रशासनाचा निषेदाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळा उप जिल्हा उपजिल्हा प्रमुख संभाजीराव भोकरे, तालुकाप्रमुख ,जयसिंग टिकले , वाहतूक सेना शहर प्रमुख महाळूकरी कट्टी ,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर प्रमुख अजित मोडेकर, वाहतूक सेना तालुका अध्यक्ष नितीश डावरे ,रामदास पाटील, बाळासाहेब पाटील ,वैभव मोडेकर आदी शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

