शालेय पोषण आहारात सापडला मेलेला साप

Kolhapur news
By -

 


              कोल्हापूर न्यूज नेटवर्क


सांगली जिल्ह्यातील पलूस येथे गर्भवती माता आणि बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात मृत साप आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळात देखील उमटले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. वाळा या सापाच्या जातीचे हे मृत पिल्लू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकारानंतर या पोषण आहार वाटपाला तातडीने स्थगित करण्यात आली आहे.


वास्तविक महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास योजने अंतर्गत गर्भवती माता आणि बालकांना पोषण आहाराचे वाटप करण्यात येते. डाळ, तांदूळ, तिखट, मीठ एकत्र असणारे पॅकेट यामध्ये वाटण्यात येते. दरम्यान पलूस येथील माजी सैनिक सुभाष निवृत्ती जाधव यांनी त्यांचा नातू शिरीष याच्यासाठी आलेला पोषण आहार घरी नेला होता. आहाराचे पॅकेट उघडल्यानंतर त्यामध्ये मृत वाळा जातीचा साप आढळून आला.