नानीबाई चिखली सरपंच पदी युवराज कुंभार तर उपसरपंच पदी कुमार संकपाळ यांची निवड

Kolhapur news
By -

 

                


   


                  कोल्हापूर न्यूज नेटवर्क


         नानीबाई चिखली सरपंचपदावर मंडलिक गटाचे युवराज कुंभार तर उपसरपंच पदावर मुश्रीफ गटाचे कुमार संकपाळ यांची निवड करण्यात आली. 

          

     चिखली ग्रामपंचायतमध्ये मंडलिक, मुश्रीफ आणि घाटगे गटाची सत्ता आहे. या तिन्ही गटांमध्ये सरपंच आणि उपसरपंच पदाच्या ठरलेल्या सूत्रानुसार या निवडी करण्यात आल्या आहेत . 

    
   यावेळी बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक प्रवीणसिंह भोसले ,जि.प.च्या माजी महिला व बालकल्याण सभापती शिवानी भोसले, संजय गांधी निराधार समिती सदस्य सदाशिव तुकान , सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी  आदी उपस्थित होते.