कोल्हापूर न्यूज नेटवर्क
उरण येथे यशश्री शिंदे या मुलीची दाऊद शेख यांनी निर्गुण हत्या केली माणुसकीला काळीमा असणारी घटना उरण शहरांमध्ये घडली या घटनेचा निषेध मुरगूड शहरांमध्ये करण्यात आला. या प्रकरणाचा योग्य तपास करून आरोपीला फाशी शिक्षा द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी प्रास्ताविक दगडू शेणवी यांनी केले तर संकेत भोसले आणि ओंकार पोतदार यांनी मनोगते मांडली प्रास्ताविक मध्ये बोलताना दगडू शेणवी म्हणाले की या गुन्ह्या मध्ये आरोपीवर कडक करवाई केली पाहिजे . ओंकार पोतदार यांनी सांगितले की ज्याप्रमाणे स्त्रियांची छेड काढली म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आरोपीचा चौरंगा केला होता त्याच पद्धतीने या आरोपीला देखील कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे संकेत भोसले यांनी बोलताना सांगितले की अशा प्रकरणावर जर कठोर कायदा निघाला तर पुढे कोणीही अशी कृत्य करायला धजावणार नाही यासाठी कायद्यामध्ये फाशी शिक्षा या गुन्ह्यासाठी तरतूद केली पाहिजे. यावेळी यशस्वी शिंदे हिला श्रद्धांजली वाहण्यात आली .
शिवभक्त सर्जेराव भाट,तानाजी भराडे, सुशांत कलकुटकी, रणजीत मोरबाळे, संकेत भोसले, प्रकाश पारिशवाड,मयूर सावर्डेकर, योगेश चौगुले, विक्रम गोधडे, सचिन गुरव, विजय मोरबाळे, यांच्या सह नागरिक मोठ्या शिवभक्त व हिंदुत्ववादी संघटनासंख्येने उपस्थित होते .

