मुंबई :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. 2024 -25 मध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत मुदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना विशेषतः मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणीही दूर होतील, असा दावा देखील राज्य सरकारच्या वतीने करण्यात आला आहे.
राज्यात सध्या आरक्षणासंदर्भातील आंदोलन सुरू असल्याचे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. मराठा कुणबी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्रास होत असून काही अधिकारी विद्यार्थ्यांना त्रास देत असल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला होता.

