नवीन कर प्रणालीत दिलासाः ₹3 लाख ते ₹7 लाखांच्या कमाईवर 5% कर, करदात्यांना ₹17,500 पर्यंत थेट लाभ ; चार कोटी नोकरदार अन् पेन्शनधाराकांना फायदा,

Kolhapur news
By -

                 नवी दिल्ली : अर्थसंकल्पात प्राप्तिकरात दिलासा देण्यात आला आहे. नवीन कर प्रणालीनुसार, आता 3 लाख ते 7 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5% दराने कर भरावा लागेल. त्याच्या स्लॅबमध्येही बदल करण्यात आले आहेत. याशिवाय, नवीन कर प्रणालीमध्ये आता 50 हजार रुपयांऐवजी 75 हजार रुपयांचे स्टँडर्ड डिडक्शन मिळणार आहे. या दोन्ही बदलांमुळे करदात्यांना रु. 17,500 पर्यंत फायदा होईल. मात्र, जुन्या कर प्रणालीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

       अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकरसंदर्भात मोठ्या बदलाची घोषणा केली. यामुळे नवीन करप्रणाली निवडणाऱ्या नोकरदारांना त्याचा फायदा होणार आहे. चार कोटी नोकरदार आणि पेन्शनधारकांचे 17 हजार 500 रुपये वाचणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन करप्रणालीत स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा 50 हजार रुपयांवरून 75 हजार रुपये केली आहे. त्याचा हा फायदा होणार आहे. यापूर्वी स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा 2019 मध्ये बदलण्यात आली होती. एकीकडे नवीन करप्रणालीत बदल करताना जुनी करप्रणाली ‘जैसे थे’ ठेवली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाकडून अपेक्षा लावून बसलेल्या मध्यमवर्गींचा भ्रमनिराश झाला आहे.