मुरगूडच्या शिवभक्तांनी केली सर पिराजीराव तलावाची महाआरती.

Kolhapur news
By -

 

            



                कोल्हापूर न्यूज नेटवर्क


मुरगूड शहराला पिण्याच्या पाण्याचा वर्षभर पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनीला वरदायिनी असलेला सर पिरजिराव तलाव पूर्ण भरला आहे. सांडव्यावरून  पाणी रस्त्यावर पडले आहे.

    

हा आनंदोत्सव साजरा करण्याकरिता येथील शिवभक्तांनी सांडव्या वरूनच तलावाची महा आरती केली.याच शिवभक्तांनी उन्हाळ्यात तलावाची बाजूने स्वच्छता केली होती.काठावरच्या दारू बियर च्या बाटल्या नगरपालिकेच्या कचरा गाडीत भरून कचरा डेपोत नेवून टाकल्या होत्या .तलावाला येऊन मिळणारे ओढे,ओहोळ यांची सुध्दा स्वच्छता केली होती.

   

लोकसेवा समजून केलेल्या कामाचे मानसिक समाधान त्यांच्या चेहेऱ्यावर दिसत होते.तलाव काठोकाठ भरल्याने त्यांचा आनंद द्वगुणित झाला होता.