गोकुळ दूध संघाची सामाजिक बांधिलकी

Kolhapur news
By -

        


                कोल्हापूर न्यूज नेटवर्क


      गेल्या काही दिवसांपासून अति पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महापूर आला असून, काही पूरग्रस्त गावातील लोकांना जनावरांसह स्थलांतरीत करणेत आलेले आहे. महापुराने शिरोळ तालुक्यातील अनेक लोकांचे व जनावरांच मोठे हाल झाले आहे. गुरुदत्त शुगर्स, टाकळीवाडी ता. शिरोळ यांनी सामाजिक बांधिलकी मधून पंचक्रोशीतील राजापूर, भैरववाडी, कुरुंदवाड, मजरेवाडी, अकिवाट, दानवाड इ. गावांमधील सुमारे ४०० ते ५०० जनावरे कारखान्याच्या आवारात व गोडाऊनमध्ये स्थलांतरीत केलेली आहेत.


त्याकरिता गोकुळ कडून आज गुरुदत्त शुगर्स च्या छावणीला आठ टन पशुखाद्य तसेच पार्वती सूतगिरणी मौजे तेरवाड येथील छावणीतील २०० जनावरांना करिता चार टन पशुखाद्य असे एकूण १२ मे.टन महालक्ष्मी पशुखाद्य संघाचे चेअरमन अरुण डोंगळे व सर्व संचालक मंडळ, प्रमुख मान्यवर, संघाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत वाटप करणेत आले. तसेच त्या भागातील जनावरांच्या छावण्यांना भेट दिली.

यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की, गोकुळने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली असून या भावनेतूनच महापुरामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना मदतीचा हात देत आहोत.