महिलांचे १३ हजार न्यूड व्हिडिओ रेकॉर्ड केल्याप्रकरणी डॉक्टरला अटक

Kolhapur news
By -

 


 वॉशिंग्टन : हजारो महिला व मुलींचे न्यूड व्हिडिओ रेकॉर्ड केल्याप्रकरणी अमेरिकेत एका भारतीय डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे एक-दोन नव्हे तर तब्बल १३ हजार व्हिडिओ आढळलेत.


पोलिसांच्या माहितीनुसार, उमैर एजाज असे या डॉक्टरचे नाव आहे. तो २०११ मध्ये वर्क व्हिजावर अमेरिकेला गेला होता. मागील ६ वर्षांपासून महिला व मुलींचे नग्न व्हिडिओ चित्रित करत होता. त्याच्याकडे असे १३ हजार व्हिडिओ सापडलेत. मिशिगन पोलिसांनी त्याच्याकडून १५ इतर उपकरणेही जप्त केली आहेत. पोलिसांनी त्याला गत ८ ऑगस्टला अटक केली. त्याने आपल्या रुग्णालयाच्या बाथरूम, कपडे बदलण्याच्या खोल्या आदी ठिकाणी छुपे कॅमेरे लावले होते. एवढेच नाही तर स्वतःच्या घरातही त्याने हे कॅमेरे लावले होते. एजाजच्या पत्नीनेच ही माहिती दिली. त्यानंतर त्याच्या घरी छापेमारीची कारवाई करण्यात आली, अशी माहिती ऑकलंड काऊंटीचे शेरीफ माईक बुचर्ड यांनी दिली आहे. इंडिया टुडेने यासंबंधीचे वृत्त दिले आहे .