कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड येथील सर पिराजी तलावाच्या जलाशयाचे अतिरिक्त पाणी रस्त्यावर साचून मोठया प्रमाणात शेवाळ झाले होते.त्यामुळे दुचाक्या घसरून मोठ्या प्रमाणात अपघात होत होते.ते शेवाळ समाजसेवी कांहीं समाजसेवी स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त काम करून काढून टाकले.
त्यासाठी त्यांनी अग्निशामक दलातील पाण्याच्या फोर्स ,टी सी एल पावडर,ब्रश इत्यादी साधनांचा वापर केला.
या पाण्याला सांडव्याचे पाणी म्हणतात .ते पावसाळ्यात साचून पुढे दोन महिने तरी रस्त्यावर रहाते.
शेवाळ पूर्ण निघुन गेल्याने रस्ता अपघात मुक्त झाला आहे. या कार्यात सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांची नावे अशी.माजी उप नगराध्यक्ष दगडु शेणवी,सर्जेराव भाट,ओंकार पोतदार,तानाजी भराडे, नगर परिषदेचे आरोग्य अधिकारी सचिन भोसले,मुकादम बबन बारदेसकर ,व सर्व स्वच्छता कर्मचारी .
रस्त्यावरूनआता सुरक्षित वाहतूक सुरू आहे.


