कोल्हापूर न्यूज नेटवर्क
शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे , राजे अखिलेशसिंह घाटगे आणि राजे विरेंद्रसिंह घाटगे यांनी सहकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षात आज मुंबई येथे जाहीर प्रवेश केला.
या प्रसंगी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक,माजी आमदार प्रकाशराव आवाडे,जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
समरजितसिंह घाटगे यांच्याबरोबरच कागलच्या विकासासाठी कार्यरत असलेले प्रमुख पदाधिकारी देखील भाजपामध्ये सहभागी झाले. यामध्ये कागल पंचायत समितीच्या सभापती सौ .सुवर्णा पाटील, नगरपालिकेचे उपाध्यक्ष जयवंत रावण, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कृष्णात पाटील, जि.प.सदस्या सौ. शिवानी भोसले, कागल पंचायत समिती सदस्य अनिलकुमार हेगडे ,सौ.रंजना अस्वले, कागल नगरपालिका नगरसेवक (गटनेता) दिपक मगर , कागल नगरपालिका शिक्षण समिती सभापती अरुण गुरव, महिला बालकल्याण समिती सभापती सौ.सारिका बारड, नगरसेविका सौ. साधना पाटील, नगरसेवक सुशांत कालेकर, उमेश सावंत, बाळासो माळी,सौ. मेघा माने ,आनंदा पसारे, विजय राजिगरे, कैलास जाधव, सामाजिक कार्यकर्ते संभाजी फराकटे तसेच कोल्हापूर, कागलचे अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते यांचा समावेश आहे.
----------------------------------

