उद्योगपतीची आपल्या पत्नीसह नदीत उडी मारून आत्महत्या

Kolhapur news
By -

 

           


       कर्जाच्या डोंगराला कंटाळून उत्तर प्रदेशातील एका उद्योगपतीने आपल्या पत्नीसह गंगा नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उजेडात आली आहे. हे दाम्पत्य आपल्या दुचाकीवरून हरिद्वारला पोहोचले होते. तिथे त्यांनी एक सेल्फी घेतली आणि त्यानंतर आपल्या सुसाईड नोटसह ती मित्राच्या व्हॉट्सएपवर पाठवली. त्यानंतर गंगेत उडी मारून त्यांनी आपली जिवनयात्रा संपवली.

   पोलिसांच्या माहितीनुसार, सौरभ बब्बर व मोना बब्बर अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. सौरभचा मृतदेह हाती लागला असून, मोनाच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. आम्ही कर्जाला कंटाळून आत्महत्येचा निर्णय घेतला. आमची संपत्ती आमच्या दोन्ही मुलांना द्या. त्यांचा सांभाळ त्यांचे आजी-आजोबा करतील. कारण, आमचा इतर कुणावरही विश्वास नाही, असे त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. हे दाम्पत्य घटनेच्या दिवशी १० ऑगस्ट रोजी दुचाकीवरून १०० किमी अंतर कापत हरिद्वारला पोहोचले होते.