कोल्हापूर न्यूज नेटवर्क
आज ९ ऑगस्ट .राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांच्या चिरंतन स्मृतीला वाहिलेला हा दिवस.
मुरगूड मधील शिवतीर्थावर त्यांना अभिवादन करून शिवभक्तांनी क्रंतीदिन साजरा केला.
भगत सिंग राजगुरू , चंद्रशेखर आझाद या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या राष्ट्रभूमिसाठी फाशीचा फंदा सुध्दा पुष्पहारासारखा स्विकारला .
मुरगूडची भूमी सुध्दा ४२ च्या स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांच्या बलिदानाने पावन झाली आहे.या क्रांतिकारकांनी गारगोटी येथील ब्रिटिश सरकारच्या तहसीलदार कचेरीवर हल्ला केला होता. मुरगूडचा हुतात्मा तुकाराम चौक हा त्या सहा क्रांतिकारकांच्या हौतात्म्याची साक्ष देतो.
या क्रांतिकारकांच्या तेजस्वी इतिहासाची शालेय विद्यार्थ्यांना सुध्दा माहिती होणे गरजेचे आहे.
येथील शिवराज विद्यालयातील विद्यार्थ्यांना हा इतिहास समजावून देवून त्यांना फळे ही वाटण्यात आली.
यावेळी मुरगूडचे माजी उपनगराध्यक्ष संतोष वंडकर व दगडु शेणवी,शिवभक्त सर्जेराव भाट ,शिवराजचे शिक्षक रविंद्र जलिमसर, पवन तेलंग उपस्थित होते.


