कोल्हापूर न्यूज नेटवर्क
केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा मोठ्या ताकदीने उभारण्यासाठी प्रयत्न करू, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. आगीच्या भक्षस्थानी सापडलेले संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे कोल्हापूरच्या सांस्कृतिक चळवळीचा फार मोठा ठेवा आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी रोम या देशात गेल्यानंतर तिथले नाट्यगृह पाहून इथल्या स्थानिक नाट्य रसिकांसाठी ते बांधले होते. हे नाट्यगृह आगीत जळून भस्मसात होणे ही हृदयाला चटका लावणारी गोष्ट आहे, अशा शब्दात मंत्री मुश्रीफ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.


