बांगला देशात हिंदूवर अनन्वित अत्याचार ; भारताने हस्त क्षेप करावा.

Kolhapur news
By -

 

                  


                   कोल्हापूर न्यूज / वि .रा.भोसले


बांगला देशात सत्तांतर झाले.तसे ते अनेक देशात झाले आहे.अनेक क्रांत्या झाल्या आहेत.सिंहासने डळमळून पडली आहेत.

    बांगला देशात तेच झालंय ,पण त्याहून विचित्र आणि विकृत प्रकार म्हणजे निष्पाप हिंदुंवर अत्याचार होत आहे.

    आश्चर्य म्हणजे तेथील पोलिस आणि सेना सुध्दा त्याविरुद्ध कांहीं कारवाई करत नाही .याचा अर्थ त्यांचा त्यांना पाठिंबा आहे हेच सिध्द होते.

    विद्यार्थी आंदोलक हे आरक्षण व तसल्याच कांहीं मागण्या करिता आंदोलन करत होते.मग या अत्याचाराच्या घटना आल्या कोठून ?

    केवळ नफरत.

   भारत विरोध

  भारताविषयी द्वेष.

 कट्टर पंथीय मुस्लिमांच्या बाबतीत हे कांहीं नवीन नाही.

    शेख हसीना यांचा पक्ष.अवामी लीग.त्यातील हिंदू नेत्यांची कत्तल होते याचा अर्थ काय ?

    तेथील हिंदू स्त्रियांना मुस्लिम महिलांनी डांबून ठेवणे हे कशाचे द्योतक आहे ?

    या महिला वासनांध कट्टर पंथीयांच्या हाती लागल्या तर त्यांची काय अवस्था होईल.माणुसकी पेक्षा धर्म श्रेष्ठ नसतो हे त्या मुस्लिम महिलांना का कळत नाही ?

   की त्यांना हे कामच दिलेले असावे ?

    अनेक ठिकाणी जाळपोळ  झाली.त्यात जिवंत माणसं जाळली गेली.

    नामवंत हिंदू कुटुंबे आणि कलाकार सुध्दा या हिंसाचारात सुटले नाहीत.

   हिंदूंना कट्टरपंथी काफिर मानत आले आहेत.भारतात मुस्लिमांना बांधव मानण्यात येते.शाळकरी पोरांच्या पुस्तकातून सुध्दा बंधुभाव  वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे.

  मग ही एवढी नफरत  आली कोठून.

  आपल्या देशातून तर नक्कीच नाही.

   पाकिस्तान हा एक हताश देश आहे.त्यांच्याच युद्ध प्रवृती मुळे बांगला देश वेगळा झाला.कलम 370 गेल्याने काश्मीर कायमचे गेले. पिओके पण अस्थिर आहे.अफगाणिस्थान,बलुची स्थान हे पाकिस्तानच्या  अतिरेकी कारवायांच्या विरोधात आहेत. युएयी समन्वयाच्या भूमिकेत आहे.

 पाकिस्तान एकाकी पडला आहे.चीन हा कांहीं मित्र नाही.भारताला कमकुवत करण्याकरता चीन पाकिस्तानचा उपयोग करून घेतोय. श्रीलंका आणि पाकिस्तान यांना चीनने अक्षरशः भिकेला लावले आहे.

   भारताची जगात एक शांतता प्रेमी राष्ट्र म्हणून गणना होत आहे.रशिया अमेरिका हे बलाढ्य देश सुध्दा भारताचे मित्र बनले आहेत.

   या सगळ्यां गोष्टी पाकिस्तान ला अधिकाधिक हताश करत आहेत.

बांगला देश हे एक मोठे निमित्त मिळाले आहे.भारतात जे करता येणार नाही ते बांगला देशात आय एस आय ला शक्य आहे.

  तेथील कट्टर पांथियाना चिथावणी देऊन हिंदुंवर अत्याचार चालवले आहेत.आतापर्यंत पाचशे च्या वर लोक मारले गेले आहेत.

भारत सरकार ने बांगला देश सेनेशी संपर्क साधून हिंदूंचे हत्याकांड थांबवले पाहिजे.वक्फ बोर्ड बिला पेक्षा ते महत्वाचे आहे.

   जे काश्मीर मध्ये घडले तेच बांगला देशात घडत आहे.

 हिंदू संयमी,सहुष्णू आहेत.ते साधी दगड फेक सुध्दा करू शकत नाहीत.

 त्यांना जीवन कळले आहे.पण दुर्दैवाने बांगलादेशी अतिरेकी विकृत कट्टर पंथीयांच्या दृष्टीने ते काफिर आहेत.

   बांगला देशचा अंतर्गत मामला म्हणून भारत सरकार जर स्वस्थ बसले तर येथील हिंदू समाज सरकारला माफ करणार नाही. 

  माणूस म्हणून जगणे हाच जर गुन्हा असेल तर बांगला देशातील हिंदूंना राम सुध्दा वाचवू शकणार नाही.