कोल्हापूर न्यूज नेटवर्क
पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने कांस्यपदक जिंकले आहे. टीम इंडियाने स्पेनचा 2-1 असा पराभव केला. दोन्ही गोल कर्णधार हरमनप्रीत सिंगने केले. 10 गोलांसह तो या स्पर्धेतील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे.
हा ऑलिम्पिक कांस्यपदक सामना गोलरक्षक श्रीजेशचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. ऑलिम्पिकपूर्वीच त्याने निवृत्ती जाहीर केली होती.
ब्रिटनविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात श्रीजेशने 11 पेनल्टी कॉर्नर वाचवले होते. हा सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला, त्यातही त्याने 2 शानदार बचाव केले.
भारतीय संघाने ऑलिम्पिकमध्ये सलग दुसरे कांस्यपदक जिंकले आहे. टोकियोमध्ये जर्मनीला हरवून भारताने कांस्यपदक जिंकले. हॉकीचे ऑलिम्पिकमधील हे 13 वे पदक आहे


