कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड येथील नगर परिषदेच्या इमारतीत उपनगराध्यक्ष यांच्या कार्यालयात दोन मुस्लिम व्यक्तींनी मंगळवारी दुपारी नमाजपठण केले.यामुळे अनेक युवक तेथे जमले त्यांनी या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला . त्यामुळे गावात तणाव निर्माण झाला.
मुरगूड हे गाव सर्व धर्म भाव जपणारे असून या घटनेमुळे उगीचच धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे.दोन तीन वर्षे हा प्रकार सुरू आहे.
दोषी व्यक्तीवर कडक कारवाई व्हावी व या प्रकारांमागे नगरपरिषद कर्मचारी किंवा लोक प्रतिनिधी असतील तर त्यांचेवर कठोर कार्यवाही व्हावी अशी मागणी करणारे निवेदन मुरगूड येथील नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले आहे.
निवेदनावर खालील व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके ,माजी उपनगराध्यक्ष दगडु शेणवी , माजी नगरसेवक शिवाजीराव चौगुले , माजी नगरसेवक दत्तात्रय मंडलिक, माजी नगरसेवक अक्षय शिंदे .
याशिवाय अन्य युवा नागरिक असे...
सुनील चौगुले,रणजित सुर्यवंशी,अभिषेक पाटील,विजय गोधडे,पंकज नेसरीकर,ओंकार पोतदार,सर्जेराव भाट,बाळासो चव्हाण,रणजित मोरबाळे,राजेंद्र चव्हाण,राहुल चौगुले,समरजीत चव्हाण,आदित्य मेटकर,सोहम भोसले,वेदांत पाटील,सत्याजित शिंदे,प्रकाश मांगले,विशाल मेंडके,पंकज मेंडके, सुभाष अनावकर,तानाजी भराडे,प्रशांत ओतरी व इतर.

