भारत नव्हे तर भारताबाहेरील लाेक देखील संतप्त - शाहू महाराज

Kolhapur news
By -

 


           


     मुंबई: मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत काय झालं ते आपण सर्वांनी पाहिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मान सर्वांनीच ठेवला पाहिजे,. या घटनेनंतर महाराष्ट्रभर, भारत नव्हे तर भारताबाहेर देखील लोक संतप्त झाले आहेत.ज्यांनी महाराजांचा अपमान केला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी  खासदार शाहू महाराज यांनी केली. 

          मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. महाविकास आघाडीने या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात आंदोलनाला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने मुंबई येथे आंदोलन आयोजित केले होते. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले  उपस्थित होते. यावेळी छत्रपती शाहू महाराजांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.