मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर करण्यास बंदी

Kolhapur news
By -

          

             


                कोल्हापूर न्यूज नेटवर्क


कोल्हापूर जिल्हयात सध्या गणेशोत्सव मोठया उत्साहाने साजरा केला जात आहे. या गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक गणेश मंडळाकडून मोठ्या प्रमाणात मिरवणुकांचे आयोजन केले जाते. सदर मिरवणुकीमध्ये गणेश मंडळ हे लेझर लाईट वापर मोठ्या प्रमाणात करीत आहेत, त्यामुळे  मानवी जीविताला, आरोग्याला  धोका निर्माण  होण्याचा संभव आहे,  त्यामुळे मिरवणुकीमध्ये लेझर लाईट वापरास प्रतिबंध करणे आवश्यक असलेने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (१) मध्ये नमुद तरतुदीच्या अनुषंगाने सदरच्या कलमानुसार अप्पर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी तसा आदेश काढला आहे .