तीन लाखावर गणेशमुर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन

Kolhapur news
By -

 

           



               कोल्हापूर न्यूज नेटवर्क


       गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष, टाळ्यांचा गजर करत भक्तीमय वातावरण जिल्ह्यात घरगुती गणेशाचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले. नदी, तलाव या ऐवजी विसर्जन कुंड, इराणी खण व गावागावात, गल्लोगल्ली ठेवलेल्या काईलमध्ये विसर्जन करत भक्तांनी पर्यावरण बचावचा संदेश दिला. निर्माल्य शंभर टक्के पाण्याबाहेर साठवत प्रदुषण न करण्याची परंपरा कायम ठेवली. सुमारे तीन लाखावर मूर्तीचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.


पाच दिवसाच्या उत्सवानंतर सकाळपासूनच घरगुती गणेशाचे विसर्जन सुरू झाले. कोल्हापूर शहरात यावर्षीही पर्यावरणपूरक गणपती विसर्जनासाठी गर्दी झाली होती. महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती.. इराणी खण येथे मोठ्या प्रमाणात गणेशाचे विसर्जन सुरू होते. याशिवाय गल्लीबोळात ठेवलेल्या काईलमध्ये पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले. नदी, तलाव, तळ्यांचे प्रदुषण टाळण्यासाठी निर्माल्यही एकत्र जमा करण्यात आले. कोल्हापूरकरांचा उपक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद दिला.