कोल्हापूर न्यूज नेटवर्क
या गणेशोत्सवादरम्यान कागलचे माजी आमदार संजयबाबा घाटगेंना गणपती पावणार असल्याची चिन्हे असून त्यांना नजीकच्या काळात केडीसी बँकेचे संचालक पद मिळेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे .
लोकसभा निवडणुकीमध्ये कागल तालुक्यामध्ये महाविकास आघाडीच्यावतीने संजयबाबांनी चांगली कामगिरी केल्यामुळे शाहू महाराजांना मोठे मताधिक्य मिळाले होते . त्यामुळे कागल विधानसभेसाठी येत्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने संजय बाबांना तिकीट मिळेल आणि कागल मधली लढत तिरंगी होईल असे बोलले जात होते , पण संजयबाबांनी त्यांचा पाठिंबा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना जाहीर केल्यामुळे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची बाजू भक्कम झाली आहे . या सर्व घडामोडी दरम्यान आता कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदावर संजयबाबांना संधी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

