कोल्हापूर न्यूज नेटवर्क
विद्या मंदिर बाचणी शाळेने नवोदय परीक्षा व प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये उज्ज्वल यश मिळवल्याबद्दल पंचायत समिती शिक्षण विभाग कागल यांच्यावतीने विद्यार्थी , मार्गदर्शक शिक्षक यांचा सत्कार कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन , प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर ,गटशिक्षणाधिकारी सारिका कासाेटे, विस्तार अधिकारी आर .एस .गावडे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला.
विद्या मंदिर बाचणी शाळेची विद्यार्थीनी दिक्षा कांबळे हिची नवोदय विद्यालय साठी निवड झाली, तिला जयवंत पाटील व मेघाराणी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले .
चौथी प्रज्ञा शोध परिक्षेमध्ये स्तुती पाटील , परी पाटील , सम्यक शितोळे , अहिल्या पाटील , समिक्षा पाटील , श्रीशा पाटील , अर्णव पाटील , श्लोक चौगले , आरुष पाटील हे विद्यार्थी प्रज्ञाप्राप्त झाले त्यांना सुरेश सोनगेकर यांचे मार्गदर्शन लाभले .
सातवी प्रज्ञाशोध परीक्षेत विराज कुंभार , शौर्या पाटील प्रज्ञाप्राप्त झाले त्यांना एस के पाटील व के एस बारड यांचे मार्गदर्शन लाभले .
यावेळी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या समवेत मार्गदर्शक शिक्षक ,मुख्याध्यापक आवेलीन देसा व सर्व शिक्षक वृंद, केंद्रप्रमुख तानाजी आसबे उपस्थित होते.
--------------------------------------------

