कागलचे सेतू केंद्र राज्यात आदर्श - आयुक्त दिलीप शिंदे

Kolhapur news
By -

 

    


            


                  कोल्हापूर न्यूज नेटवर्क


     कागल तहसीलदार कार्यालयातील आपले सरकार सेवा केंद्राची (सेतू)  'पथदर्शी प्रकल्प ' या उपक्रमासाठी महाराष्ट्र राज्यातून निवड करण्यात आली. कागलचे हे केंद्र सर्वार्थाने आदर्श केंद्र आहे. नागरिकांना आवश्यक सेवा,सुविधा ,चौकशी व मार्गदर्शन कक्ष उत्तम आहे.हे केंद्र राज्यात आदर्श आहे असे गौरव उद्गार राज्य सेवा हक्क आयोग पुणे महसूल विभागचे  आयुक्त दिलीप शिंदे यांनी काढले.

  

आयोगाने सुचवलेल्या टाईप प्लॅन प्रमाणे कागलच्या आदर्श आपले सरकार सेवा केंद्राची निर्मिती  केली आहे.केंद्रामध्ये नागरिकांना बैठक व्यवस्था ,रॅम्पवर व्यवस्था केलेली आहे.सर्व सोयी सुविधायुक्त केंद्र आहे.सुचना फलक इतर माहिती फलक लावले आहेत. केंद्रातील सर्व दप्तर अद्यावत करण्यात आले आहेत , तसेच सेतू मधील सर्व कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड व ओळखपत्र देण्यात आली आहेत.

   

   कोल्हापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्या नियोजनानुसार आणि कागल तहसीलदार अमरदिप  वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार रूपाली सुर्यवंशी ,महसूल नायब तहसीलदार डाॅ.अर्चना कुलकर्णी ,निवडणूक नायब तहसीलदार विनय कौलवकर यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श केंद्राचे  उद्घाटन करण्यात आले.

 

पाहुण्यांचे स्वागत सेतू व्यवस्थापक  अनिल भोसले यांनी केले.आभार  नितीन मायने यांनी मानले.या प्रसंगी अस्मिता कांबळे,तृप्ती सणगर,संजना सणगर,शितल ढोबळे व इतर  उपस्थित होते.

     

कागलचे पोलीस निरीक्षक अवधूत लोहार, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष प्रताप उर्फ भैय्या माने, नगरसेवक संजय चित्तारी, अमित पिष्ठे यांनी सेतू केंद्रास भेट देऊन  समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.