ग्रामीण भागातील महिलांच्यासाठी आरोग्य शिबिरांची गरज - डॉ.स्वाती पाटील

Kolhapur news
By -

 

         


                कोल्हापूर न्यूज नेटवर्क


ग्रामीण, दुर्गम भागातील गरीब व गरजू महिलांच्या गरजा ओळखुन सामान्य जनतेला आरोग्याच्या दृष्टिकोनातून फायदा व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवुन शिबिर फायदेशीर असल्याचे महिला प्रदेश सचिव महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टी डॉ स्वाती पाटील यांनी सांगितले.


त्या शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे येथे डॉ. स्वाती दिपक पाटील संजिवनी मल्टीपर्पज फाऊंडेशन तर्फे बोरपाडले यांच्या तर्फे बांबवडे येथे मोफत फिरता दवाखाना आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष पांडुरंग वग्रे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी होते. या शिबिराचा जवळजवळ दीडशे ते दोनशे महिलांनी, ग्रामस्थांनी लाभ घेतला. यावेळी सरपंच भगतसिंह चौगुले, उपसरपंच दिपक निकम, सुरेश नारकर स्वप्निल घोडे पाटील, संजय पाटील, दिलीप बंडगर, शरद निकम, दीपल पाटील, डॉ. रमेश पचकर, ग्रामसेवक मोरे उपस्थित होते.