कोल्हापूर न्यूज नेटवर्क
भोसे ( मिरज ) येथे झालेल्या विभागीय
शासकीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत १७ वर्षा खालील गटात येथील शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या संघाची नागपूर येथे होणाऱ्या
राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे .
भोसे ( मिरज ) येथे कोल्हापूर , सांगली , सातारा , रत्नागिरी , सिंधुदुर्ग या जिल्ह्याचे
संघ सहभागी असलेल्या विभागीय शासकीय शालेय १७ वर्षाखालील व्हॉलीबॉल स्पर्धा झाल्या
या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व
करणाऱ्या येथील शिवराज विद्यालयाच्या संघाने
अंतिम सामन्यात सिंधुदुर्ग जिल्हयाच्या संघास २५ - १२ व २५ -१५ अशा गुण फरकांनी पराभूत करीत
प्रथम क्रमांक पटकावला .तत्पूर्वी कोल्हापूर महानगर पालिकेचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघाचा
२५ - ९ , २५ - १६ असा पराभव केला. उंपात्य
सामन्यात रत्नागिरी संघाचा २८ - २६ व २५ - १४ असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली.
संघातील खेळाडू असे : उद्धव चौगले ( कप्तान ) , विश्वराज जाधव , विक्रम रानमाळे , मितेश सावंत , रोहन भारमल , संस्कार हासबे , तन्मय भारमल , साकेत शेंडगे , श्रेयस भारमल , वीरधवल चौगले , पार्थ महाजन
या खेळाडूंना व्हॉलीबॉल प्रशिक्षक , माजी प्राचार्य महादेव कानकेकर , क्रीडा शिक्षक एकनाथ आरडे , संभाजी मांगले , अजित गोधडे , विनोद रणवरे ,सुहास भारमल , अमित साळोखे, करण मांगले , श्रावण कळांद्रे यांचे मार्गदर्शन लाभले . तर संस्था सेक्रेटरी मा.खा. संजयदादा मंडलिक , कार्याध्यक्ष विरेंद्र मंडलिक , अध्यक्ष गजाननराव गंगापुरे , कार्यवाह आण्णासो थोरवत , प्राचार्य जी के भोसले , उपमुख्याध्यापक व्ही बी खंदारे , पर्यवेक्षक पी पी सुर्यवंशी , उपप्राचार्य एल व्ही शर्मा यांचे प्रोत्साह