कोल्हापूर न्यूज / वि.रा.भोसले
राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. सॅम पित्रोदा सारखे बरबटलेल्या विचारांचे काही जुने काँग्रेसी त्यांच्या समवेत आहेत.त्यांना राहुलला पी एम पदावर बसलेले पहायचे आहे.
राहुल चे नागरिकत्व दोन देशात आहे. राहुल गांधी अमेरिकेत जाऊन काय काय बरळत आहेत त्याच्याही पोस्ट व्हायरल झाल्या आहेत.
राहुल हे संसदेत विरोधी पक्ष नेते आहेत.सरकारला विरोध असावाच लागतो.सरकार किंवा सत्ताधारी यांच्या विरोधात ते कांहीही बोलले तरी चालेल.तेही इथे संसदेत.
राहुल यांची विधाने इतकी पोरकट असतात की विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांना ती शोभत नाहीत.
अमेरिकेत टेक्सास मध्ये अशीच पोरकट विधाने ते करत आहेत.
आम्हीं सत्तेवर आलो की आरक्षण रद्द करण्याचा विचार करु वगैरे.
मोदींच्या विरोधात बोलता बोलता ते देशाच्या विरोधात सुध्दा बोलू लागलेत.बेरोजगारी हा घोळून गुळगुळीत झालेला मुद्दा त्यांच्या ओठावर असतो .त्याशिवाय मणिपूर,अग्निविर ,यावर सुध्दा ते बरळत असतात.
परदेशात जाणारे इथले अनिवासी भारतीय सुध्दा देशाबद्दल किती अभिमान बाळगतात .गणेशोत्सव,गोकुळाष्टमी त्यांनी तिथे उघडपणे साजरी केली.त्यांना तेथे नोकऱ्या,व्यवसाय, करायला मुभा आहे.ठराविक मुदतीचे नागरिकत्व पण असते .तेथे पैसा कमवतात.पण देशाला व आपल्या संस्कृतीला विसरत नाहीत.आपले पंतप्रधान त्यांना भेटले की छोटा तिरंगा हाती घेऊन फडकवतात.
आणि आपल्या देशाचा नेता असलेले राहुल मात्र देशाच्या विरोधात बरळतात.
किती लज्जास्पद आहे.अमेरिकेच्या व्हाइट हाऊस मधील कांहीं अधिकाऱ्यांनी सुध्दा याबद्द्ल आश्चर्य व्यक्त केले आहे.
मोदी सरकारच्या विरोधात बोलताना त्यांची पातळी घसरते व आपला देश भारत आहे हे सुध्दा ते विसरतात.
नेता होण्याची कसलीही पात्रता नसलेला हा अपरिपक्व नेता केवळ घराण्याच्या सहानुभतीवर उड्या मारतो.तसे अनेक नेते आपल्याकडे आहेत.
केवळ द्वेष, मत्सर यातून ते वैफल्य ग्रस्त झालेत.परदेशी बँकात त्यांची अब्जावधी रुपयांची खाती आहेत.
देशा विषयीच्या स्वाभिमानाचे एखादे तरी खाते त्यांनी मनात उघडायला काय हरकत आहे.! !
---------------------------------------------------
Mary Bilman, an employee in White House, USA is surprised to see why Indians vote for Rahul Gandhi who always speaks negatively about his own country.
👇

