मुंबई :अक्षय शिंदेचे एन्काउंटर फेक असले तरी हरकत नाही. कारण, आमच्या लेकीबाळींवर वाईट नजर ठेवणाऱ्या अशा प्रवृत्तींना समाज व देशात राहण्याचा कोणताही अधिकार नाही, असे वादग्रस्त विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी केले आहे. पोलिसांच्या या एन्काउंटरवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थिति केले असताना निरुपम यांनी हे विधान केल्यामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे .
संजय निरुपम मंगळवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, हे एन्काउंटरच आहे असे मला सांगण्यात आले आहे. पण हे एन्काउंटर फेक असले तरी हरकत नाही. कारण आमच्या लेकीबाळींवर वाईट नजर ठेवणाऱ्या, त्यांच्यावर बलात्कार करणाऱ्या अशा प्रवृत्तींना समाज व देशात राहण्याचा कोणताही अधिकार नाही. अशा लोकांचा समाजाला कोणताही उपयोग नसतो. त्यामुळे त्यांना मारलेच पाहिजे.