तहसीलदारांचीच खुर्ची पेटवली

Kolhapur news
By -

          



मराठा आंदोलकांनी आरक्षणाच्या मागणीसाठी थेट तहसीलदारांची खुर्ची पेटवून दिल्याची घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात घडली आहे. या घटनेमुळे शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांचा संयम आता सुटत चालला असल्याचे चित्र आहे.


मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटीत बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाचा आजचा 8 वा दिवस आहे. पण सरकारने अद्याप त्याची दखल घेतली नाही. यामुळे मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झालेत. या आंदोलकांनी मंगळवारी सकाळी फुलंब्री तहसील कार्यालयात येऊन जोरदार नारेबाजी केली. त्यानंतर तहसीलदारांच्या दालनातून त्यांची खुर्ची बाहेर आणून ती पेट्रोल टाकून पेटवून दिली.

------------