दुर्गामाता दौड ; नवरात्री उत्सवाचा आगळा उपक्रम

Kolhapur news
By -

 

           



                  


                    कोल्हापूर न्यूज नेटवर्क

           

        नवरात्री उत्सव हा केवळ एक धार्मिक उत्सव नाही .दुर्गेची नऊ रूपे  कोणती आहेत हे सांगणारा हा उत्सव आहे.कीर्ती,आरोग्य,धन,शिक्षण,सुख,समृध्दी, प्रसिध्दी भक्ती आणि शांती.अशी ही नऊ रूपे आहेत.

    

     सर्व धर्मात आणि जाती पंथात याच नऊ गुणांसाठी सतत धडपड सुरू असते.पर धर्म सहिष्णुता हे हिंदू धर्माचे तत्व आहे.याचा अर्थ इतरांनी केलेल्या अन्याय अत्याचाराला उत्तर द्यायचे नाही असा मात्र होत नाही.शिवाजी महाराजांनी हीच शिकवण महाराष्ट्रालाच नव्हे तर साऱ्या देशाला दिली आहे.


       दुर्गे ने सुध्दा अशाच अन्याय अत्याचाराला मूठमाती दिली आहे .दुर्गेच्या जागराचा खरा अर्थ दुर्गामाता दौड या उपक्रमातून देण्यात आला आहे.

  

    विशेष म्हणजे यात  तरुणांच्या बरोबर लहान मुले आणि महिलांचाही सहभाग असतो. त्यामुळेच नवरात्रीच्या या अनोख्या जागराची उत्सुकता वाढत आहे.


----------------------------------------------