काेल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड येथील प्रजापिता ब्रम्हा कुमारी विश्वविद्यालयाने नवरात्रीतील अप्रतिम असा सजीव देखावा सादर केला.
डोळ्याचे पारणे फेडणारा हा देखावा मुरगूड आणि पंचक्रोशीतील भाविकांचे मोठे आकर्षण ठरले.
नऊ महिलांनी सादर केलेल्या नऊ आदिशक्ती देवतांचे विहंगम दृश्य तर होतेच पण जोडीला लता बहेन व लक्ष्मी बहेन यांनी
सादर केलेले सुश्राव्य निवेदन सुध्दा होते.
या निवेदनात त्यांनी लक्ष्मी,सरस्वती, काली,संतोषी, शितला,वैष्णवी ,दुर्गा, मिनाक्षी आणि ज्ञानगंगा या नऊ देवतांचे महात्म्य सुध्दा वर्णन केले.
देवतांची सजीव रूपे सादर करणाऱ्या युवतींचे देवता रूपातील दर्शन पाहून भाविक नतमस्तक झाले आणि हात ही जोडले गेले.तीन तासांहून अधिक स्थिर अवस्थेत राहून देखावा सादर करणे म्हणजे एक अप्रूप होते आणि सजीव सजावट सादर करणाऱ्या कलावंत साधकांचे सुध्दा मनभरून कौतुक झाले.
या साधकांची नावे याप्रमाणे ,
अनिल अंगज,राजेंद्र कांबळे,भिकाजी भांदीगरे,श्रीमंदर,संभाजी पाटील,तुकाराम भांबरे,सागर नाधवडे,बाजीराव मगदूम.


