कोल्हापूर न्यूज नेटवर्क
नागपूर येथे झालेल्या १७ वर्षाखालील शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेतून महाराष्ट्राच्या व्हॉलीबॉल संघाची निवड करण्यात आली . त्यामध्ये येथील शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी व राणाप्रताप व्हॉलीबॉल क्लबचा खेळाडू कु. विक्रम पांडूरंग रानमाळे ( इ. ११ वी ) याची महाराष्ट्राच्या व्हॉलीबॉल संघात निवड झाली आहे. बरेली ( उत्तर प्रदेश ) येथे होणाऱ्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत तो महाराष्ट्राच्या संघातून खेळणार आहे
त्यास व्हॉलीबॉल प्रशिक्षक , माजी प्राचार्य महादेव कानकेकर , क्रीडा शिक्षक एकनाथ आरडे , संभाजी मांगले , अजित गोधडे , विनोद रणवरे , सुहास भारमल , अमित साळोखे, करण मांगले , श्रावण कळांद्रे , गजानन गोधडे , नंदु चौगले यांचे मार्गदर्शन लाभले . तर संस्था सेक्रेटरी मा.खा. संजयदादा मंडलिक , कार्याध्यक्ष विरेंद्र मंडलिक , अध्यक्ष गजाननराव गंगापुरे , कार्यवाह आण्णासो थोरवत ,प्राचार्य जी के भोसले , उपमुख्याध्यापक व्ही बी खंदारे , पर्यवेक्षक पी पी सुर्यवंशी , उपप्राचार्य एल व्ही शर्मा यांचे प्रोत्साहन लाभले.
---------------------------------

