कोल्हापूर न्यूज नेटवर्क
श्री सद्गुरु बाबुमामा फौडेशन मार्फत श्री अर्पण ब्लड बँक कोल्हापूर यांचेवतीने श्री बाळूमामांचे जन्मकाळ उत्सवानिमित्त प्रतिवषप्रिमाणे यावर्षी २६ वे रक्तदान शिबीर पार पडले. शिबीराचे उद्घाटन श्री बाकुमामांचे मेंडके व विश्वस्त श्री. भिकाजी शिणगार रुकडीकर यांचे शुभहस्ते करण्यात आले यावेळी एस. के.पाटील तंटामुक्त अध्यक्ष एल. जी. पायल, हनुमान देवालय अध्यक्ष सागर पाटील, बाळूमामा विकास सेवा संस्था मा. चेअरमन नामदेव पाटील, सरपंच विजयराव गुरव प्रमुख उपस्थित होते.
श्री बाळुमामांच्या जन्मकाळानिमित्य रक्तदान करणाऱ्यांना चांगले आरोग्य लाभते या भावनेतून प्रतिवर्षी नियमित रक्तदान करणारे शेकडोंच्या घरात आहेत. याही वेळी त्यांनी सहभाग नोंदवला असून २५० जणांनी रकदान शिबीरात सहभाग नोंदवला आहे. यावेळी महिला व तरुण युवक यांचा सहभाग लक्षणीय होता. यावेळी प्रत्येक रक्तदात्यास आशिर्वाद घोंगडी प्रदान करण्यात आली. श्री. बाळूमामा देवालय आदमापूर कार्याध्यक्ष श्रीमती रागिणी खडके यांचे हस्ते हा समारंभ पार पडला.
यावेळी प्रकाश खापरे, सत्यजीत गुरव, आनंदा पाटील शिवभक्त सर्जेराव भाट, जगदिश गुरव, शिवप्रताप पाटील, युवराज पाटील समीर पाटील, दयानंद पाटील, रोहित पाटील (फौजी), आकाश पाटील अमेय पाटील, सौरभ हंचनाळे, स्वप्निल पाटील, काशिनाथ शिणगारे, श्रीरंग पाटील उपस्थित होते, नामदेव पाटील सुशांत पाटील, हर्षद पाटील, मयूर सणगर सुजय पाटील, उदय पाटील, राज पाटील , साताप्पा खापरे, मयुर पाटील उपस्थित होते.
-------------------------------------

