अनेक सामाजिक संघटना राजकीय बनल्यामुळे परिवर्तनाच्या जबाबदारीची जाणीव ठेवा- राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डॉ. सुभाष वायदंडे

Kolhapur news
By -

 

        


                  

 सांगली- समाजावर सातत्याने अन्याय होत असताना त्या अन्यायाच्या विरोधात पेटून उठून रस्त्यावर लढाई करून परिवर्तन घडवण्याची जबाबदारी ज्या सामाजिक संघटनांनी स्वीकारली होती त्याच संघटनांनी सोयीस्करपणे समाजाला बाजूला सारून राजकीय आश्रय घेतल्यामुळे आता रस्त्यावरची लढाई लढून सामाजिक परिवर्तन करण्याची जबाबदारी पुरोगामी संघर्ष परिषदेवर आहे याची जाणीव ठेवून सामाजिक परिवर्तन घडवा असे आवाहन पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक डॉ.प्रा.सुभाष वायदंडे यांनी सांगली येथील हॉटेल लोटस मधील सभागृहात झालेल्या संघटनेच्या राज्यस्तरीय बैठकीत बोलताना केले.

 

   यावेळी वरिष्ठ प्रदेशाध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब साठे (सातारा ), महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सौ. सुनीता खटावकर (सांगली), शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. बाळासाहेब चोपडे (सांगली), महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा वनिता पवार (सोलापूर ), वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष राजू दादा घाटगे (कोल्हापूर ), राज्य सल्लागार कमिटीचे सदस्य हनुमंत (दादा) जाधव (खंडाळा), राज्य संपर्कप्रमुख मधुकर (दादा) चव्हाण (बार्शी ),पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष गणेश घाटगे कोल्हापूर,राज्य उपाध्यक्ष भानूदास भिसे (पुणे), सोलापूर महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सविताताई नवगिरे, सोलापूर वरिष्ठ जिल्हाध्यक्ष शंकर कांबळे, सांगली वरिष्ठ जिल्हाध्यक्ष सागर लांडगे, कोल्हापूर वरिष्ठ जिल्हाध्यक्ष दौलत घाटगे, सातारा वरिष्ठ जिल्हाध्यक्ष शंकरराव चव्हाण, पुणे वरिष्ठ जिल्हाध्यक्ष निवृत्ती खुडे, सोलापूर  जिल्हाध्यक्ष उमेश वाघमारे  यांची भाषणे झाली.

 

सदर राज्यस्तरीय बैठकीसाठी महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा अश्विनी नवले,  पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख कृष्णाजी गायकवाड, सोलापूर युवक जिल्हाध्यक्ष भारत कदम, कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय दावणे, सांगली ग्रमीण जिल्हाध्यक्षा कविता माने,सातारा उत्तर विभागीय जिल्हाध्यक्ष रामचंद्र भिसे, सांगली वरिष्ठ महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संगीता हावगुंडे, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष योगेश शितोळे, पश्चिम महाराष्ट्र सचिव नंदिनी वाघमारे, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी संपर्कप्रमुख रेणुका बनसोडे, मिरज शहराध्यक्ष मेहक निशाणदार, सांगली जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्ष मंगल हाताळे, सांगली जिल्हा संघटक ॲडव्होकेट विकास गेंड, सांगली जिल्हा सरचिटणीस सर्जेराव भंडारे, पुरोगामी टीव्ही टेन चे संपादक लखन वायदंडे, मोहोळ तालुका अध्यक्ष कड्याप्पा पवार, मोहोळ तालुका युवक अध्यक्ष अभिजीत नेटके, पंढरपूर तालुका अध्यक्ष स्वप्निल म्हस्के, मिरज तालुका उपाध्यक्ष मुकेश कोठावळे इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेचे महाराष्ट्रातून आलेले प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

 शेवटी आभार राज्याचे प्रसिद्धीप्रमुख पांडुरंग ऐवळे यांनी मानले.



  पुरोगामी संघर्ष परिषदेच्या  सांगली येथे राज्यस्तरीय बैठकीत बोलताना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डॉ.सुभाष वायदंडे, वरिष्ठ प्रदेशाध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब साठे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सौ. सुनीता खटावकर, शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रा.बाळासाहेब चोपडे व इतर