मुलांनो , आई-वडिलांची स्वप्ने बना : शिक्षक नेते भरत रसाळे

Kolhapur news
By -

             




                  कोल्हापूर न्यूज नेटवर्क  

  

  शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात येणारी दहा वर्षे  महत्त्वाची असून स्वतःची स्वप्ने पहाच पण मुलांनो , तुम्ही आई-वडिलांची स्वप्ने बना असे आवाहन  महाराष्ट्र राज्य खा प्राथ शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष शिक्षक नेते भरत रसाळे यांनी केले . ते कसबा ठाणे येथील जय शिवराय हायस्कूल मधील इ .१०वीच्या  गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण व गुरुवंदना कार्यक्रमात बोलत होते .कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी उपसरपंच उमेश पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक रोहित हवलदार , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व्यंकट पाटील, युवराज जांबोळीकर व बी . डी .पाटील हे होते .


या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिक्षक नेते श्री. भरत रसाळे  यांच्या हस्ते तालुक्यात प्रथम आलेल्या दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी ,प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.


  या वेळी बोलतांना श्री. भरत रसाळे सर म्हणाले की '  विद्यार्थ्यानी आईवडील गुरूजन यांचा आदर ठेवून मोठी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी शिस्त, चिकाटी ठेवून सातत्यपूर्ण परिश्रम, करावे पण त्याच बरोबर तुम्ही आईवडीलांची स्वप्ने  बनून ती पूर्ण करा " असे आवाहन त्यांनी केले . विद्यार्थ्यांनी गुरुवंदना गीत गाऊन गुरुजनाप्रती कृतज्ञता व्यक्त केली .


प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय व्हनागडे यांनी केले आभार दिपीका पाटील यांनी मानले तर सूत्रसंचलन सुनील पाटील यांनी केले .


कार्यंक्रमास अनिल आडनाईक , अशोक कांबळे, तेजस्विनी महाडीक , सौ जाधव यांच्यासह परिसरांतील पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता .



                     -----------------------------