कोल्हापूर न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य समन्वय संघाच्या झेंड्याखाली सर्व पेन्शन लढ्यातील संघटनांना एकत्र आल्या असून 28 सप्टेंबर पासून आझाद मैदानात 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी न्याय मिळेपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे. आंदोलनाची धार वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना इच्छा मरणाच्या परवानगीचा मेल करणे.जुन्या पेन्शनची लढाई अंतिम टप्प्यात आल्याचे नमूद करीत आमदार, खासदार यांचे समर्थन पत्र मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
संघटनेच्या वतीने विविध अधिवेशन काळात मुंबई, नागपूर, शिक्षण आयुक्त पुणे येथे बरीच आंदोलन केली. प्रत्येक अधिवेशनात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक व्हावी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना व मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना तत्काळ सेवानिवृत्ती नंतरचे लाभ मिळावेत.नागपूर खंडपीठाने आदेशीत केलेल्या काही निवड्यामध्ये तसेच माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेशीत केल्याप्रमाणे आयुक्त शिक्षण पुणे यांच्या अध्यक्षतेखाली केलेल्या समितीची चिरफाड न करता 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी अंशतः/ टप्पा अनुदान प्राप्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना तात्काळ जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात यावी. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना उपदानासाठी नियुक्ती दिनांकच ग्राह्य धरण्यात यावे.
शिक्षण क्षेत्रातील अन्यायकारी नवीन अंशदायी निवृत्ती योजना तात्काळ बरखास्त करून सर्वच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनीच 1982 ची पेन्शन योजना देण्यात यावी.आपल्या हक्काची पेन्शनसाठी मुख्यमंत्र्यांच्या दारी नागपूर येथे आंदोलन केले पण शासनाने कोणतीही दखल घेतली नाही.महाराष्ट्र राज्य पेन्शनग्रस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी सर्वच शाळांना भेटी देऊन 28 सप्टेंबर चे आंदोलन यशस्वी करावे याकरिता प्रयत्न करीत आहेत. शिक्षण क्षेत्रातील सर्व संघटना, संस्थाचालक, सामाजिक संघटनानी आंदोलनास पाठिंबा द्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य पेन्शनग्रस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या पुणे येथील बैठकीमध्ये राज्याध्यक्ष प्रा.विजय शिरोळकर, सचिव भास्कर देशमुख, प्रा. योगेश्वर निकम, प्रा. संपत कदम, सुनील कांबळे, डॉ.गोविंद गोडसे, डॉ. कल्याण वाघ, ॲड गजानन एंडोले, शरद चोडणकर, प्रा. निशिकांत कडू , प्रा. अभिजीत धानोरकर आदीनी केले आहे. अशी माहिती प्रसिद्धीस राज्याध्यक्ष विजय शिरोळकर यांनी दिली.
---------------------------

