कोल्हापूर न्यूज नेटवर्क
हेरले /प्रतिनिधी
सत्ताधारी जय शिवराय ग्रामविकास आघाडीचे नेते व शिवसेना शिंदे गटाचे उपतालूकाप्रमुख सुरेश कांबरे यांची मौजे वडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली . यापूर्वीचे उपसरपंच स्वप्नील चौगुले यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते . आघाडीच्या ठरलेल्या रोटेशन पद्धतीनुसार सुरेश कांबरे यांना संधी मिळाली . सुरेश कांबरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने सरपंच कस्तुरी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हि बिनविरोध निवड करण्यात आली . यासाठी जयशिवराय ग्रामविकास आघाडीच्या नेतेमंडळीनी प्रयत्न केले.
यावेळी माजी उपसरपंच सुनिल खारेपाटणे , स्वप्नील चौगुले, रघुनाथ गोरड, नितिन घोरपडे ,सविता सावंत , सुनिता मोरे, सुवर्णा सुतार , दिपाली तराळ, मिनाक्षी आकिवाटे , ग्रामपंचायत अधिकारी भारती ढेंगे - पाटील, यांच्यासह जय शिवराय ग्रामविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी , व ग्रामस्थ उपस्थित होते.
------------------------

