श्री सद्‌गुरु विनयानंद महाराज यांची ६ वी पुण्यतिथी निमित्त बुधवार दि. २३ सप्टेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

Kolhapur news
By -

 

                  


             कोल्हापूर न्यूज नेटवर्क


                         हेरले / प्रतिनिधी


श्री सद्गुरु निरंजन महाराज आश्रम, मौजे वडगांव (ता. हातकणंगले ) येथे श्री सद्‌गुरु विनयानंद महाराज यांची ६ वी पुण्यतिथी बुधवार दि. २३ सप्टेंबर रोजी संपन्न होत आहे. त्यानिमित्त आश्रमामध्ये खालील प्रमाणे कार्यक्रम आयोजित केले आहेत.



सुर्योदय ६:३० वा. : सद्‌गुरु मुर्ती व पादुकांना अभिषेक,सकाळी ८:०० ते ९:०० : नोंदणी व चहापान,सकाळी ९:०० ते ११:००: भजन : ह.भ.प.डॉ. गुंडोपंत कुलकर्णी व  शौकत बहुरुपी व सहकारी, हेरले सकाळी ११:०० ते १२:००: प्रवचन: ह.भ.प.श्री. सुहास लिमये (अनुभवानंद)

दुपारी १२:०० ते १२:०५ :पुण्यतिथी सोहळा पुष्पअर्पण व प्रार्थना

प्रवचन : ह.भ.प.श्री. इंद्रजित देशमुखसो (वासुदेवानंद सरस्वती) दुपारी १२:०५ ते १:०० : दुपारी १:०० ते १:१०: सद्‌गुरु आशिर्वचन

दुपारी १:१० ते १:२५: सत्कार समारंभ : (अमृतहस्ते) सद्‌गुरु श्री अभिनव कल्पेश्वर महाराज, शिरगुर सद्‌गुरु श्री केदारलिंग शरणजी महाराज, केरुर (कर्नाटक) गुरुवर्य श्री मधुकर पाटील महाराज, कावणे परमार्थभूषण  नारायण महाराज एकल, जोगेवाडी स्वामीभक्त 

श्री. नंदूआण्णा माणगांवकर, शिरोळ

: महाप्रसाद दुपारी १:३० ते ३ः३०

दुपारी ३:३० ते ५:३० : अभंगवाणी: प्रस्तुत ह.भ.प.सौ. विद्याताई पाटील (गोटखिंडी, सांगली)सायं. ५:३० ते ६:३०: प्रवचन : वेदांतकेसरी ह.भ.प.श्री. उदयशास्त्री महाराज पाटील (गोटखिंडी, सांगली)

सायं. ६:३२ वा. : सुर्यास्त व आरती



 या सर्व कार्यक्रमास सद्भक्तांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन श्री सद्‌गुरु निरंजन महाराज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले आहे.


                 ---------------------------