कोल्हापूर न्यूज नेटवर्क
धुंदवडे ता . गगनबावडा येथे समूहसाधन केंद्रामध्ये नूतन केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल केंद्रप्रमुख राहुल पाटील यांचा शिक्षक संघ गगनबावडा यांच्यामार्फत सत्कार करण्यात आला . यावेळी केंद्रप्रमुख राहुल पाटील म्हणाले,विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी आपण प्रयत्नशील राहू .शिष्यवृत्ती ,नवोदय ,एनएमएमएस (राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा )यासारख्या विविध स्पर्धा परीक्षेतून तसेच कला, क्रीडा, सांस्कृतिक ज्ञानदानाच्या पवित्र कार्यातून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी कटिबद्ध राहू .मान्यवरांच्या हस्ते केंद्रप्रमुख पाटील यांचा शाल श्रीफळ बुके देऊन सत्कार करण्यात आला . प्रास्ताविक मुख्याध्यापक विश्वनाथ चौगले यांनी केले . आजपर्यंत गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने केंद्रस्तरावर राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा त्यांनी थोडक्यात आढावा घेतला .
कार्यक्रमास गगनबावडा तालुका शिक्षक संघाचे सरचिटणीस श्रीपती तेली,संजय कुंभार,आनंदा पोवार,संभाजी कांबळे,मारुती गुरव,सौ . सरिता देसाई, नवनाथ लिंगायत, प्रसाद जाधव,ऋतुराज बामणीकर ,कृष्णा धोंड ,संभाजी पाटील ,अनिल लटके ,रघुनाथ दळवी उपस्थित होते .सूत्रसंचालन व आभार एम .जी गुरव यांनी मानले .
धुंदवडे ता . गगनबावडा येथे शिक्षक संघटनेच्या मार्फत नूतन केंद्रप्रमुख राहुल पाटील यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी उपस्थित मान्यवर .
---------------------------


