छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान रविवारी २ ऑगस्ट रोजी चाेकाक मध्ये होणार

Kolhapur news
By -

 

      


              

                  कोल्हापूर न्यूज नेटवर्क


      

          प्रत्येक  जिल्हयास मिळणा-या नियतवयाच्या प्रमाणात कोणताही बदल न करता महाराष्ट्र शासन कार्यालयाकडून जनतेस सोई सुविधा उपलब्ध करून देण्याकरीता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान रविवार दिनांक ०२ ऑगस्ट रोजी विशाल मंगल कार्यालय चोकाक  (ता. हातकणंगले )येथे सकाळी १०-०० ते दुपारी २-०० पंर्यत आयोजित केले आहे.


     शासनाने महसूल विभाग अधिक लोकाभिमुख पारदर्शक व गतिमान करण्यासाठी जाणीवपूर्वक निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा लाभ तळागाळापर्यत् शेवटच्या माणसापर्यत् पोहोचला पाहीजे यासाठी शासन प्रयत् करीत आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्याने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर प्रत्येक विधानसभा मतदार संघानिहाय 22 जुलै ते 2 ऑगष्ट २०२६ अखेर आयोजन करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार हातकणंगले विधानसभा क्षेत्रात "गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण " या योजने अंतर्गत या शिबीराचे आयोजन केले आहे.

    या कार्यक्रमास खासदार धैर्यशिल माने,  खासदार  धनंजय महाडिक, आमदार अशोकराव माने, आमदार अरूण लाड, शिक्षक आमदार  जयंत आसगांवकर, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील,जिल्हाधिकारी विजय राठोड,

,अपर जिल्हाधिकारी अजय पवार, उपविभागीय अधिकारी इचलकरंजी उपविभाग दिपक शिंदे,  उपजिल्हाधिकारी रोहयो कोल्हापूर तथा नोडल अधिकारी हातकणंगले विधानसभा मतदार संघ शक्ती कदम आदी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.

   सदर शिबीरामध्ये हातकणंगले तालुकेतील विविध लाभाचे वाटप व वितरण तसेच विविध योजनाची माहिती देणेत येणार आहे.

तहसिल कार्यालय हातकणंगले, यांचे मार्फत -

 जिवंत सातबारा वाटप करणेत येणार आहे.

लक्ष्मी योजनेचा लाभ देणेत येणार आहे.

 पाणंद रस्ता मुक्ती सलोखा योजना माहिती देणेत येणार आहे.

   दाखले-उत्पन्न, जात, अधिवास, आणि नॉन क्रिमिलेअर दाखले,

शिधापत्रिका - नवीन शिधापत्रिका, दुबार शिधापत्रिका नावे कमी करणे व वाढ करणे.

  सामाजिक न्याय योजना- संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गाधी वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना

 श्रावण बाळ सेवा निवृत्ती योजना, नवीन अर्ज भरून घेणे व पात्र लाभार्थीना मंजूरी आदेश देणे.


पंचायत समिती, हातकणंगले, यांचे मार्फत

 आरोग्य विभाग जननी सुरक्षा योजना,

आरोग्य विभाग गोल्डन कार्ड,

 आरोग्य विभाग:- Delivery CRCPortal Registration,


    कृषि विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेअंतर्ग नवीन विहीर खुदाई व दुरूस्ती,

 पशूसंवर्धन विभाग वैरण बियाणे, पशूसंवर्धन विभाग संविधान प्रत वितरण,

JCDS लेक लाडकी योजना, JCDS प्रधानमंत्री मातृवंदन योजना, स्वच्छ भारत मिशन SBM, शिक्षण विभाग.

   भूमि अभिलेख कार्यालय, हातकणंगले, यांचे मार्फत

 भूमि अभिलेख कार्यालय मिळकत पत्रिका,

 भूमि अभिलेख कार्यालय क प्रत मोजणी नकाशा


   तालुका कृषि कार्यालय, हातकणंगले, यांचे मार्फत

 शेतकरी योजना नमो शेतकरी महासन्मान योजना. पी.एम. किसान योजना

 पीक विमा संदर्भात मार्गदर्शन निधी वाट


     तात्रिक मार्गदर्शन-

आधुनिक कृषि अवजारे,

 ठिबक सिंचन अनुदान आणि माती, परीक्षण अहवालचे वाटप

नगर परिषद / नगरपंचायत विभाग. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) घरकूल योजनेसाठी पात्र लाभार्थी,

 प्रधानमंत्री स्वनिधी योजना रस्त्यावरील विक्रेत्यांना खेळते भांडवल म्हणून १०,२०, आणि ५० हजार रूपये कर्ज उपलब्धकरून देण्यासाठी बँकांशी समन्वय साधणे तयार करणे

दिनदयाल अंतोदय योजना- राष्ट्रीय उपजिवीका योजना- महिला बचत गटाची बांधणी करणे मालमत्ता कर व फेर फार

 नागरी सुविधा प्रमाणपत्रे जन्म-मृत्यू दाखले, विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि अग्नीशमन नाहरकत दाखले दिले जातात.

   अपंग व समाजकल्याण योजना नगरपालिकेच्या ५ टक्के निधीतून दिवयांगासाठी राबविल्या जाणा-या कल्याणकारी योजना निधी वाटप करणे.

तालुका पशूसंवर्धन विभाग हातकणंगले, यांचे मार्फत दुभत्या जनावरांचे वाटप योजना (गाय-म्हैस)योजना २,४,६ दुभत्या गायी व म्हैस वाटप योजना व माहिती देणेत येणार आहे.

  अनुदान:- :- अनुसुचित जाती (SC) आणि अनुसुचित जमाती (ST) साठी ७५ टक्के अनुदान तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५० टक्के अनुदान दिले जाते.

 शेळी मेंढी पालन योजना-

१० शेळया + १ बोकड किंवा १० मेंढया +1 नर मेंढा असा गट दिला जातो.

 अनुदान :- ५००० ते ७५०० रू पंर्यत अनुदान दिले जाते.

पात्रता :- ज्याच्याकडे शेळ्या मेंढया ठेवण्यासाठी जागा आहे जे या व्यवसायाचे अनुभव आहे.

    कुक्कूटपालन (कोंबडी पालन) योजना. :

परसातील कुक्कूट पालन - यामध्ये कमी खर्चात जास्त उत्त्पन्न मिळविण्यासाठी २५ ते ५० सुधारित जातीच्या पक्षांचे (उदा. कावेरी, आर. आय. आर) वाटप केले जाते.

 व्यवसायिक कुक्कूट पालनः- १००० मांसल पक्षी (Broiler) किंवा तलंगा पालनसाठी शेड आणि पक्षी खरेदीसाठी अर्थसहाय्य दिले जाते.

     महावितरण कार्यालय हातकणंगले, यांचे   मार्फत

 सोलर उर्जा योजना

 पंतप्रधान सुर्यघर मोफत वीज योजनाची माहिती देणेत येणार आहे

परिवहन महामंडळ इचलकरंजी, यांचे मार्फत

 एस.टी. सवलत पास योजना, विविध सवलतीची माहिती देणेत येणार आहे.

पोष्ट ऑफीस हातकणंगले, यांचे मार्फत

आधार दुरूस्ती, बचत खाते, विमा योजनाची माहिती देणेत येणार आहे.

   याप्रमाणे या शिबीरामध्ये जास्तीत जास्त लाभ लाभार्थीना देण्यात येणार आहे तरी सदर शिबिरास सर्वाना स्नेह भोजनाची व्यवस्था कार्यक्रमस्थळी केलेली आहे. तालुकेतील सर्व नागरिकांनी उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहान प्रसिद्धी पत्रकाद्वारे तहसिलदार हातकणंगले  सुशिल बेल्हेकर यांनी प्रशासनाच्या वतीने केले आहे.


             ------------------